breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय! २० वर्षाचा दुष्काळ संपवला

IND vs NZ : काल झालेल्या सामन्यान भारताने न्यूझिलंडचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने तब्बल २० नंतर न्यूझीलंडचा पराभव केला आहे. मात्र, या दरम्यान विराट कोहलीचे शतक पाच धावांनी हुकले. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचली आहे.

धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले.

हेही वाचा – आकुर्डीतील पालखी तळ सुशोभीकरणासह प्रलंबित कामे मार्गी लावावीत

भारताकडून मोहम्मद शमीने ५ आणि कुलदीप यादवने २ विकेट पटकावल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक विकेट मिळवली. प्रत्युत्तरात विराट कोहलीने शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने ९५ धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने ४६ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ३९ धावा केल्या. मात्र, त्याचे ४९वे शतक हुकले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button