breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची मोठी घोषणा,अवघ्या 7500 रुपयांत व्हेंटिलेटर बाजारात आणणार

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने मोठी घोषणा केली आहे. कंपनी अवघ्या ७५०० रुपयांत व्हेंटिलेटर बाजारात आणणार आहे. सध्या बाजारात व्हेंटिलेटरची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वाचवण्यासाठी व्हेंटिलेटर महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ऑटोमेटेड वॉल्व मास्क व्हेंटिलेटर, ज्याला सामान्यपणे अंबु बॅग असेही म्हटले जाते. त्याचा प्रोटोटाइप तीन दिवसांत मंजुरीसाठी सादर केला जाऊ शकतो, असे कंपनीने म्हटले आहे. 

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या एका टि्वटमध्ये म्हटले की, आम्ही देशी आयसीयू व्हेंटिलेटवर काम करत आहोत. या मशिनची सध्याची किंमत ५ ते १० लाख रुपये आहे. हे उपकरण जीवनरक्षक आहे आणि आमच्या टीमचा अंदाज आहे की, याची किंमत ७५०० रुपयांपेक्षा कमी असेल.

यापूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका म्हणाले होते की, कंपनी दोन मोठ्या सार्वजनिक कंपनी आणि एका व्हेंटिलेटर निर्माता कंपनीबरोबर यावर काम करत आहे. या माध्यमातून मोठ्या संख्येने याचे उत्पादन करता येईल. 

आनंद महिंद्रा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, आम्ही बॅग व्हॉल्व मास्क व्हेंटिलटेरच्या ऑटोमेटेड व्हर्जनवर काम करत आहोत. तीन दिवसांत मंजुरीसाठी ते तयार होईल. एकदा याच्यावर शिक्कामोर्तब झाले तर उत्पादनासाठी हे उपलब्ध होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button