breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

महावितरण : शिराळा उपविभागकडून वीज पुरवठा सेवा अखंडित; ग्राहकांना दिलासा

शिराळा । महाईन्यूज । प्रतिनिधी

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून लाॅकडाऊन करण्यात आले आहे. तरीही, महावितरणच्या शिराळा उपविभागाची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी नियोजनबद्ध काम करीत आहे. आरोग्याची योग्य खबरदारी घेऊन अभियंता व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य देत कर्तव्य बजावत आहेत, अशी माहिती उपअभियंता पी.एम. बुचडे यांनी दिली.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे महावितरणकडून विविध उपाययोजनांसह वीजपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवेसाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांत ५ टक्के उपस्थितीची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही बुचडे म्हणाले.

प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तसेच कार्यालयप्रमुखांना मास्क, लिक्विड हॅण्डवॉश, सॅनेटायझर उपलब्ध करूनध देण्यात आले आहेत. यासोबतच दुरुस्तीच्या कामासाठी जाताना अभियंता व जनमित्रांनी स्वतःचे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो तत्परतेने पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही गंभीर तांत्रिक बिघाडामुळे वेळ लागल्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण शिराळा उपविभागकडून करण्यात येत आहे.

ग्राहकांनी ऑनलाईन वीज बिल भरून सहकार्य करावे
महावितरण कोव्हीड-19 या विषाणूच्या संकट काळातही अखंडित वीज पुरवठा करण्यास बांधिल आहे. पण,या काळात वीज ग्राहकांनी मोबाईल एप तसेच महावितरणच्या संकेत स्थळाला भेट देऊन ऑनलाईन वीज बिल भरून सहकार्य करावे. ग्राहकांनी घरीच थांबावे. शिराळा उपविभागात आम्ही अखंडित विजसेवा देणार आहोत. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपअभियंता पी.एम. बुचडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button