breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

व्हॉट्स अ‍ॅपच्या व्हिडिओ कॉलिंग फीचरमध्ये महत्त्वाचा बदल

व्हॉट्स अ‍ॅप आपल्या युजर्ससाठी काहीना काही नविन फिचर्स आणतच असतं…आता पुन्हा एकदा व्हॉट्स अ‍ॅपनं आपल्या व्हिडिओ कॉलिंग या फीचरमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या व्हिडिओ कॉलिंगद्वारे एकाचवेळी ४ जण एकमेकांशी संपर्कात येऊ शकतात. मात्र व्हॉट्स अ‍ॅप ही मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती WABetaInfo नं दिली आहे.

एकावेळी किती जण व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्कात येऊ शकतात याचा आकडा जाहीर झालेला नाही, मात्र व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंगद्वारे १२ जणांशी एकत्र संवाद साधता येईल असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी गुगल ड्युओनं देखील व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवून ती १२ पर्यंत नेली होती. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button