breaking-newsTOP Newsमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक: कोण आहेत आमने-सामने वाचा?

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२० च्या वेगवेगळ्या मतदारसंघात आता सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीनं त्यांचे उमेदवार जाहीर केले असून यावेळीही काही जणांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळं आजही उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघ

पुणे पदवीधर मतदरासंघातून प्रमुख पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपतर्फे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रताप माने यांनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली आहे. वंचित बहुजन आघाडीनं प्रा. सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केलीय. मनसेकडून रुपाली पाटील, जनता दलाकडून शरद पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाकडून डॉ. अमोल पवार अर्ज दाखल करणार आहेत. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदासंघ

राष्ट्रवादी काँग्रेसनं औरंगाबाद पदवीधर मधून सतीश चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. भाजपनं 2014 च्या निवडणुकीत पराभतू झालेले शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीनं नागोरराव पांचाळ यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने रमेश पोकळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून जयसिंगराव गायकवाड, प्रवीण घुगे इच्छुक होते.

नागपूर पदवीधर

नागपूर पदवीधरमधून भाजपनं अनिल सोले यांना पुन्हा संधी न देता नवीन उमेदवार दिला आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना भाजपनं संधी दिली आहे. काँग्रेसने अभिजीत वंजारी यांना उमेदवारी जाहीर केली असून ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विदर्भवादी नेते नितीन रोंघे हे देखील निवडणूक लढवणार आहेत. वंचितने राहुल वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघ
पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसनं जंयत आसनगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघासाठी भाजपनं अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. एमफुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेकडून डॉ. सुभाष जाधव निवडणूक लढवणार आहेत. 2014 च्या निवडणुकीत विजयी झालेले दत्तात्रय सावंत हे देखील अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. वंचितने सम्राट शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

अमरावती शिक्षक

शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे 2014 च्या निवडणुकीत अमरावती शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले होते. यावेळी ते महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. भाजपनं नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे. दिलीप निंभोरकर हे शिक्षक भारती तर्फे तर भाजपा नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या बहीण संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समिती कडून निवडणूक लढवतील. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघांचे प्रकाश काळबांडे हे देखील निवडणूक लढवणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button