breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मेट्रोचा आढावा : विभागीय आयुक्तांची बैठक, विविध विषयांवर चर्चा

पुणे – महामेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे महामेट्रोच्या अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली. मेट्रोसाठी लागणारी जमीन, जमिनीचे संपादन, हस्तांतरण, बाधित कुटुंबे आणि दुकानांचे हस्तांतरण या विषयांवर डॉ. म्हैसेकर यांनी चर्चा केली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे, महामेट्रो पुणेचे रामनाथ सुब्रमण्यम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, पुणे महामेट्रोचे प्रल्हाद कचरे, महामेट्रोचे बी. एस. पहाड, एसआरएचे संजय रांजणे, उपजिल्हाधिकारी वैशाली उंटावल, उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार, एसटी महामंडळाच्या यामिनी जोशी, पोलीस निरीक्षक विजय बाजारे उपस्थित होते.

मेट्रो प्रकल्पासाठी एकूण ४२ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून, त्यापैकी ३८.३० हेक्टर जमीन शासकीय, तर उर्वरित ३.७० हेक्टर जमीन खासगी आहे. या जमिनीच्या संपादन व हस्तांतरणाबाबत बैठकीत चर्चा झाली. या प्रकल्पात बाधित होणा-या ६८५ कुटुंब आणि दुकानांच्या पुनर्वसनावर चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर काही भागांत पुरातत्व विभागाच्या नाहरकत दाखला मिळणे आवश्यक आहे, त्याबाबतही चर्चा करण्यात आली, तसेच मेट्रोच्या कामावेळी शिवाजीनगर बसस्थानाकाच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी जागा शोधणे, स्वारगेट मल्टी ट्रान्सपोर्ट हबच्या बांधकामावेळी स्वारगेट बसस्थानकाच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी जागा शोधण्यावर चर्चा करण्यात आली. बैठकीत डॉ. म्हैसेकर यांनी महामेट्रोचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button