breaking-newsआंतरराष्टीय

महाभियोग चौकशी म्हणजे अध्यक्षांविरोधात बंड

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध

वॉशिंग्टन : ‘माझ्याविरोधात सुरू करण्यात आलेली महाभियोग चौकशी हा अध्यक्षांविरोधातील बंडाचा भाग आहे,’ अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याविरोधात  डेमोक्रॅटिक पक्षाने सुरू केलेल्या कारवाईचा निषेध केला. चौकशीमुळे ट्रम्प  प्रशासनाची पुरती नाचक्की होत असल्याचे चित्र सामोरे येत आहे.

परराष्ट्र मंत्री माइक  पॉम्पिओ यांनी या प्रकरणी परराष्ट्र खात्यातील पाच माजी कर्मचारी व सध्याचे  काही कर्मचारी यांचे जाबजबाब घेऊ देण्याच्या डेमोक्रॅटिक चौकशी समितीच्या मागणीला कसून विरोध केला आहे. अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिदेन व त्यांचा मुलगा हंटर बिदेन यांना युक्रेनमधील व्यवहारांच्या प्रकरणात चौकशीच्या सापळ्यात अडकवण्यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदमीर झेलेनस्की यांच्यावर फोन करून दबाव आणला होता. बिदेन हे  २०२० च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार असू शकतात.

महाभियोग चौकशीमुळे हताश झालेल्या ट्रम्प यांनी ट्विट संदेशात आपला निषेध व्यक्त केला. पॉम्पिओ यांनी डेमोक्रॅटिक सभागृह समित्यांच्या तीन प्रमुखांवर असा आरोप केला की, ही महाभियोग चौकशी म्हणजे परराष्ट्र खात्यातील लोकांना धमकावण्याचा प्रकार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button