breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

महाबळेश्वर मध्ये किल्ले प्रतापगड परिसरात आढळला १२ फुटी अजस्र अजगर

किल्ले प्रतापगड (ता महाबळेश्वर) भागात गुरुवारी बारा फूट लांबीचा अजस्र अजगर जखमी अवस्थेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सापडला आहे. त्यांनी प्राणिमित्रांच्या सहकार्याने या अजगरास पकडले आहे. त्याच्यावर डॉ. जयसिंग सिसोदिया यांनी उपचार केले आहेत. या अजगरास  पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अलधिकाऱ्यांनी दिली. वनक्षेत्रपाल महेश झंजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने या परिसराला भेट दिली आहे.

जंगलात जखमी अवस्थेत हा अजगर दिसला. त्याच्या पाठीवर जखमा झाल्या होत्या. वनरक्षक रोहित लोहार, आशिष पाटील, लहू राऊत, दीपक सोरट, महादेव कट्टे, वनमजूर वागदरे, सह्याद्री प्रोटेक्‍टर्सचे संदेश भिसे, शुभम टेके यांनी हा अजगर पकडून सुरक्षितरित्या हिरडा विश्रामगृहात उपचारासाठी आणला होता. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयसिंग ससोदिया, डॉ. संदीप आरडे यांनी या अजगरावर उपचार केले. महाबळेश्वर तालुक्‍यात प्रथमच अजगर आढळला आहे. मादी जातीच्या या अजगराचे वजन चाळीस किलोहून अधिक असून त्याचे वय अंदाजे सात ते आठ वर्षे असावे, असे सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button