breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौर पदाची संधी चिंचवडला ! या नगरसेविकांची नावे चर्चेत

  • चिंचवडच्या या अनुभवी नगरसेविकेला मिळणार संधी
  • आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निर्णयावर निवड निश्चित

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर पद खुल्या गटातील महिलेसाठी निश्चित झाले आहे. आता महापौर होण्याची संधी कोणाला मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या पदावर कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नगरसेविकेची वर्णी लागू शकते. परंतु, शहराचे राजकारण आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी केंद्रीत असल्याने त्यांच्याकडून पसंती मिळणा-या नावालाच महापौर पदावर बसण्याची संधी मिळणार आहे.

महापौर पदाच्या रेसमध्ये अनेक नगरसेविका आहेत. त्यामध्ये चिंचवडमधील नगरसेविका माधुरी उर्फ मोनाताई कुलकर्णी, पिंपळे निलख विशालनगरच्या नगरसेविका आरती चोंधे, संत तुकारामनगर येथील सुजाता पालांडे, माया बारणे यांची नावे चर्चेत आहेत. बारणे कुटुंबियांचे राजकीय प्राबल्य टिकवून ठेवण्यासाठी भाजप संलग्न असलेल्या ज्येष्ठ नगरसेविका झामाबाई बारणे यांचे नाव आघाडीवर राहू शकते.

नगरसेविका माधुरी कुलकर्णी या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विधी समिती सभापती पदाचा अनुभव आहे. त्यांच्यावरील भाऊंचा असलेला विश्वास सार्थकी लागण्याची शक्यता आहे. तर, आरती चोंधे या देखील विशालनगरमधून दोनवेळा निवडून आलेल्या नगरसेविका आहेत. त्यांनाही कामाचा प्रचंड अनुभव आहे. त्यांची काम करण्याची हातोटी पाहता त्यांच्याही नावाला पसंती मिळू शकते.

तसेच, संत तुकारामनगरच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांची देखील दुसरी टर्म सुरू आहे. त्यांनाही भाऊंच्या जवळच्या नगरसेविका मानले जाते. त्यामुळे त्यांची देखील महापौर पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवाय, थेरगाव येथील माया बारणे यांची देखील दुसरी टर्म आहे. त्यांच्या देखील नावाला प्राधान्य मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यांच्यासह नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी उपमहापौर शैलजा मोरे, शर्मिला बाबर, संगिता भोंडवे, करुणा चिंचवडे, कोमल मेवानी, सुनिता तापकीर, निर्मला कुटे, चंदा लोखंडे, सीमा चौगुले, उषा उर्फ माई ढोरे यांची नावे रेसमध्ये आहेत.

झामाबाई बारणे रेसमधील ‘डार्क हॉर्स’

ज्येष्ठ नगरसेविका झामाबाई बारणे यांची तिसरी टर्म सुरू आहे. प्रभागातील लोकांशी असलेला सलोखा आणि केलेल्या विकास कामांमुळे तेथील लोकांनी त्यांना वारंवार पसंती दिली. त्यामुळे त्यांना कामाचा मोठा अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार जगतापांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे मनापासून काम केले. त्यामुळे त्यांना मोठे मताधिक्य मिळाले. त्याची परतफेड म्हणून खासदार बारणे यांनी सुध्दा विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कुटुंबियांसह त्या भागातील मोठे मतदान जगतापांच्या पारड्यात टाकले. या कामाची पोच पावती म्हणून जगताप झामाबाईंचे नाव सुचविण्याला प्रथम प्राधान्य देतील, अशी शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button