breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची बदली

अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने पुणे विभाग महसूली संवर्गात नियुक्ती

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (एक) संतोष चंद्रकांत पाटील यांची बदली करण्यात आली. त्यांना अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पुणे विभागाच्या महसूली संवर्गात पदोन्नती दिली आहे. असे आदेश महसूल विभागाचे उपसचिव डाॅ. माधव वीर यांनी दिले.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या शिफारसीनूसार अप्पर जिल्हाधिकारी या संवर्गातील सात अधिका-यांना सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेने पदोन्नती देण्यात आली आहे. सरळसेवेने व पदोन्नतीने महसूली विभागात अप्पर जिल्हाधिकारी संवर्गात प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली. त्यानूसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना पुणे विभागात महसूली संवर्गात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

तानाजी शिंदे यांची बदली झाल्यानंतर मीरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची वर्णी लागली. मात्र, चार महिन्यातच म्हणजे 25 ऑक्टोबर 2017 रोजी तडकाफडकी बदली झाली. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते. यादरम्यान, सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार दिला होता.

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यावेळी 29 सप्टेंबर 2018 रोजी नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवडच्या अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली होती. संतोष पाटील यांची प्रथम विदर्भात यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर मराठवाड्यात ही त्यांनी विविध पदावर काम केले आहे. ते मुळचे सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button