breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘जनशक्तीपुढे धनशक्ती पराभूत होणार’, कोकाटे यांच्या प्रचारार्थ राहूल पोकळे यांचा विश्वास

  • उमेदवार डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या कचेरीचे उदघाटन
  • प्रचारात कोकाटे यांनी घेतली आघाडी

पिंपरी / महाईन्यूज

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. प्रशासनानेही याची जय्यत तयारी केली. वेगवेगळ्या पक्षांचे नेते आपल्या उमेवाराच्या प्रचारात व्यस्त आहेत. तर, दुसरीकडे इतिहास संशोधक डाॅ. श्रीमंत कोकाटे हे ही या पदवीधर निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. तर, बहुतांश मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारात आघाडी घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नुकतेच श्रीमंत कोकाटे यांच्या निवडणूक कचेरीचे उद्‌घाटन करण्यात आले आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधरच्या ३ आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या २ जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव या ठिकाणी त्यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन राष्ट्रसेवा समुहाचे संस्थापक अध्यक्ष राहूल पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोकळे म्हणाले की, अत्यंत सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेले श्रीमंत कोकाटे हे ६२ उमेदवारांमध्ये एकमेव पीएचडी असणारे उच्चशिक्षित उमेदवार आहेत. त्यांनी हजारो व्याख्याने, तसेच अनेक प्रभावशिल पुस्तके लिहीलेली आहेत. त्यांनी प्रबोधनातून केलेल्या चळवळीमुळे समाजात अनेक बदल झालेेले आहेत. महापुरूषांचे विचार ख-या अर्थाने तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम कोकाटे करीत आहेत. समाजातील उपेक्षित घटकाच्या समस्या तसेच पदवीधरांच्या विवीध प्रश्नांसाठी ते अग्रेसर राहिले आहेत. यंदाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. जनशक्तीपूढे विरोधकांच्या धनशक्तीचा निभाव लागणार नाही, सुजाण मतदार डाॅ. श्रीमंत कोकाटे यांना नक्कीच विजयी करतील, असा विश्वास राहूल पोकळे यांनी व्यक्त केला.

नागरी हक्क सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष मानव कांबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनीही डाॅ. श्रीमंत कोकाटे यांना मतदान करण्याचे आवाहन करत त्यांच्या कार्याचा आढावा मांडला. कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करत या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिष काळे यांनी केले होते. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार, माऊली सोनवणे, मोहन अडसुळ, धम्मराज साळवे, विशाल जाधव, नकुल भोईर, गिरीष वाघमारे, चंद्रकांत लांबखडे, राहूल ओझरकर, शेकापचे नितीन बनसोडे, शरद मालपोटे, नाना फुगे, अपना वतनचे हमिद शेख, पंकज घाडगे, सुभाष जाधव, महेश कांबळे, योगेश साळवी, संदिप कोकाटे आदी उपस्थित होते.

या संघटनांचा जाहिर पाठींबा !

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा महासंघ, नागरी हक्क सुरक्षा समिती, अपना वतन संघटना, सम्राट सेना, पंचशिल मंडळ-थेरगाव, बहूजन हिताय-बहूजन सुखालय ग्रंथालय, भारतीय रिपब्लिकन फेडरेशन यांच्यासह अनेक पुरोगामी संघटनांनी श्रीमंत कोकाटे यांच्या उमेदवारीला पाठींबा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button