breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत फ्लेक्सप्रकरण: प्रेमवीराला वाचविण्यासाठी महापालिका, पोलिसांची धडपड

पिंपरी –  पिंपळे सौदागर या उच्चभ्रू परिसरात ‘शिवडे आय अ‍ॅम सॉरी’ अशी फलकबाजी करून प्रेयसीची माफी मागणारा महाभाग पोलिसांना सापडला आहे. संबंधित व्यक्ती राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने दोन दिवसांनीही पोलीस आणि महापालिकेने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलीस महापालिकेवर जबाबदारी ढकलून मोकळे झाले, तर महापालिका अधिकारी ‘नॉट रिचेबल’ आहेत.

पिंपळे सौदागर, वाकड परिसरातील शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गालगत असलेल्या विजेच्या खांबांवर ‘शिवडे आय अ‍ॅम सॉरी’ असा मजकूर असलेले फलक लावल्याने शहरात खळबळ उडाली होती. सोशल मीडियावरून याचा बोभाटा झाल्याने पोलीस यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी या महाभागाला शुक्रवारी शोधून काढले होते. आदित्य विकास शिंदे (वय २५, रा. केशवनगर, चिंचवड) व त्याचा मित्र नीलेश संजय खेडेकर (वय २५, रा. घोरपडे पेठ, पुणे) यांना ताब्यातही घेतले होते.

प्रेयसीकडे माफी मागण्यासाठी खेडेकर यांनी शिंदेच्या माध्यमातून फ्लेक्स लावल्याची कबुली दिली होती. त्यानंतर हे दोघे राजकीय नेत्यांचे नातेवाईक असल्याने कारवाई होऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे अनधिकृत फलकाबाबत कारवाई किंवा तक्रार दाखल करण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने पोलिसांनी महापालिकेला कळविले आहे. दरम्यान, संबंधितांनी हे फ्लेक्स काढूनही घेतले. अनधिकृत फ्लेक्सची कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेकडे आहेत. त्यामुळे पोलीस महापालिकेवर जबाबदारी सोपवून मोकळे झाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button