breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Pune | कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या अखेर जेरबंद

पुणे | कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील बिबट्या पसार झाला होता. अखेर या बिबट्याला पकडण्यास प्रशासनाला यश आलं आहे. ४८ तासानंतर पळालेल्या बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री ९:१५ वाजता या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. बिबट्याला जेरबंद केल्याने परिसातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

सोमवारी पहाटे बिबट्या फरार झाला होता. बिबट्या फरार झाल्याने कात्रज राजीव गांधी प्राणी संग्रहलयाजवळील वस्तीमधील लोक दहशतीखाली गेले होते. या बिबट्याने प्रशासनाचीही तारांबळ उडवली होती. या बिबट्याचा वनविभाग आणि सुरक्षा अधिकारी डोळ्यात तेल घालून बिबट्याचा शोध घेत होते. या अधिकाऱ्यांना ४८ तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

हेही वाचा     –    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीची घोषणा

या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या बिबट्याच्या वेगवेगळ्या हालचाली टिपणासाठी कॅमेऱ्यासह ९ पिंजरे लावण्यात आले होते. पिंजऱ्यातून पळालेला बिबट्या एका पिंजऱ्यात अडकला. मंगळवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास आढळला.

प्राणी संग्रहालय मध्ये असणाऱ्या सांबर च्या जवळपास ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला. यासाठी कालपासून प्रयत्न सुरू होते. बिबट्याला पकडण्यामध्ये आम्हाला यश आले असून ऑपरेशन सक्सेसफुल झाले आहे असे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button