breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ मुलाखतीचा राज ठाकरेकडून खरपूस समाचार

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच व्यंगचित्रातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदींवर तोफ डागली आहे. नरेंद्र मोदी यांची नुकतीच एका वृत्तवाहिनीकडून मुलाखत घेण्यात आली. ‘एक मनमोकळी मुलाखत’ या मथळ्याखाली बनवण्यात आलेल्या व्यंगचित्रात मोदी स्वत:चीच मुलाखत घेत असल्याचे दाखवण्यात आले असून ही मुलाखत ‘मॅनेज’ असल्याचे थेट भाष्य राज यांनी व्यंगचित्रातून केले आहे.

या व्यंगचित्रात मुलाखत देणारे मोदीच आणि मुलाखतदारही मोदीच दाखवण्यात आले आहेत. ‘बोला काय विचारू?’ असे मोदी स्वत:लाच विचारत असल्याचे दाखवत राज यांनी या मुलाखतीचा खरपूस समाचार घेतला आहे.

व्यंगचित्रात मोदींच्या परदेशी दौ-यावरही भाष्य करण्यात आले आहे. विमानातून केलेला प्रवास, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, चीनमधील ड्रमवादन असे मोदीमय वातावरणत दाखवण्यात आले आहे. स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेला, मोदींचा ‘मी’पणा असे शेरे देत राज यांनी मोदींवर अनेकदा टीका केली आहे.

१ जानेवारीला मोदींनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. निवडणुक वर्षातील मोदींची ही पहिलीच मुलाखत होती. त्यामुळे मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुक, राफेल विमान करार, राम मंदीर, शेतकरी, कर्जमाफी, नोटबंदी अशा अनेक मुद्यांबाबत ही सविस्तर मुलाखत घेण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button