ताज्या घडामोडीराष्ट्रिय

इंधन दरवाढ सुरुच; मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग; वाचा आजचे दर

नवी दिल्ली |  पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नवी दिल्लीत इंधनाचे दर प्रत्येकी ४० पैशांनी वधारले आहेत. त्यामुळं एक लीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी १०३. ८१ रुपये आणि ९५. ०७ रुपये मोजावे लागत आहे.

नवी दिल्लीमध्ये २२ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत चौदा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत आहे. २१ मार्चला पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९५.४५ रुपये होता. मात्र, १४ दिवसांच्या कालावधीत सुमारे आठ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तसंच, डिझेलच्या दरातही ७ रुपये वाढ नोंदवण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव १०० डॉलर प्रति बॅरल इतका आहे. त्यामुळेच भारतात इंधन दरात वाढ होत आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर ११८. ८३ प्रति लीटर आहे. तर, डिझेलने मुंबईत शंभरी गाठली आहे. डिझेल मुंबईत १०३. ०७ रुपये प्रति लीटर पोहोचले आहे. देशातील चारही प्रमुख शहरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल- डिझेल अधिक महाग आहे.

दरम्यान, रेटिंग एजन्सी ‘क्रिसिल’च्या मते नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत तेल वितरण कंपन्यांनी इंधनदरात वाढ केली नव्हती. मात्र, महागणारे कच्चे तेल आणि होणारा तोटा कमी करण्यासाठी कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. ही वाढ साधारणत: १५ ते २० रुपयांची असण्याचा दावा करण्यात येत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button