breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मला विकत घेणारा जन्माला आला नाही – खासदार असदुद्दिन ओवैसी

ममता बनर्जी यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार

पिंपरी | टीम ऑनलाईन

भाजपा असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमला बंगालमध्ये आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी केले. या विधानावर खासदार असदुद्दिन ओवेसींनी प्रतिक्रिया दिली. ओवेसीला पैशांनी विकत घेऊ शकेल, असा कोणी जन्माला आला नसल्याचे त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांचे आरोप निराधार आहेत व त्या अस्वस्थ आहेत. त्यांनी आपल्या घराची(पक्ष)ची काळजी केली पाहिजे. कारण त्यांचे अनेक लोकं भाजपात जात आहेत. त्यांनी बिहारचे मतदार व आमच्यासाठी मतदान करणाऱ्या लोकांचा अपमान केला असल्याचे खासदार ओवैसी म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांअगोदर राजकीय वातावारण चांगलच तापल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपा नेत्यांकडून कंबर कसली गेली आहे. राज्यभर विविध रॅलींचे आयोजन केले जात आहे. तर, ममता बॅनर्जी देखील भाजपासह विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचार रॅली दरम्यान भाजपावर निशाणा साधत म्हटले की,

तर अल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी त्यांनी (भाजपा) हैदराबादची एक पार्टी(एमआयएम)ला पकडले आहे. भाजपा त्यांना पैसे देते व ते मतांचे विभाजन करण्याचं काम करतात. बिहार निवडणुकीत हे सिद्ध झालं आहे. असं ममता बॅनर्जींनी जलपाईगुडी येथील सभेत म्हटले होते.

राष्ट्रगीत बदलण्यासंदर्भात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र लिहिलं होतं. यावरही ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं. “जर भाजपानं असं काही करण्याचा प्रयत्न केला.  तर राज्यातील जनता त्यांना योग्य ते उत्तर देईल. ते आपल्या देशाचा इतिहास बदलू इच्छित आहेत. आपलं राष्ट्रगीत बदलण्याच्या गोष्टी ते करत आहेत,” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button