breaking-newsराष्ट्रिय

मला मारण्यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्नशील- ममता बॅनर्जी

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल दिलेल्या मुलाखतीमध्ये एक नवी धक्कादायक माहिती लोकांसमोर आणली आहे. ”मला मारण्यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी माझ्या हत्येची सुपारीही दिली आहे. त्यामुळे मी माझे मृत्यूपत्र करुन ठेवले आहे”, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी ही धक्कादायक माहिती सांगितली.  ”मी मृत्यूपत्रही करुन ठेवले असून जर आपली हत्या झाली तर माझा राजकीय पक्ष (तृणमूल काँग्रेस) कोणी चालवायचा हे त्यात लिहून ठेवले आहे. जरी आपली हत्या झाली तरी सर्व काही माझ्या मृत्यूपत्रातील नोंदीप्रमाणे होईल असे सांगत मला मारण्याची योजना करणारे दीर्घकालीन भविष्याचा विचार केल्यास यशस्वी होणार नाहीत” असेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

ममता यांनी अचानकच नवी माहिती लोकांसमोर आणल्यामुळे त्या नक्की कोणत्या पक्षांबद्दल बोलत आहेत असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे पण याबाबत त्यांनी काहीच माहिती दिली नाही. मी या राजकीय पक्षांचे नाव सांगणार नाही पण मी कोणत्या पक्षांबद्दल बोलत आहे हे तुम्हाला समजले असेलच असे त्या म्हणाल्या आहेत. ”मला मारण्यासाठी भाडोत्री मारेकऱ्यांना आधीच पैसे देऊन झाले आहेत असा दावाही त्यांनी केला. यापुढे त्या बोलताना त्या म्हणाल्या, मारेकऱ्यांनी माझ्या घराची रेकीही केली आहे, मात्र मी घाबरत नाही जे राजकीय क्षेत्रात माझ्याशी लढू शकत नाहीत तेच अशा प्रकारचे कृत्य करत आहेत”. ममता यांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत मोठा दावा केला असला तरी त्याबाबत कोणतीही ठोस माहिती मात्र त्यांनी दिली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button