breaking-newsराष्ट्रिय

दिल्लीत वॉलमार्टला कडाडून विरोध

नवी दिल्ली : वॉलमार्टकडून होत असलेल्या फ्लिपकार्टच्या अधिग्रहणास उजव्या संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. काही संघटनांच्या सुमारे ८० कार्यकर्त्यांनी दिल्लीत निदर्शने केली. आंदोलकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचचे कार्यकर्तेही होते. कार्यकर्त्यांच्या हातात ‘गो बॅक वॉलमार्ट’ असे लिहिलेले फलक होते.

फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय वॉलमार्टने बुधवारी जाहीर केला. हा व्यवहार सुमारे १६ अब्ज डॉलरचा आहे. अ‍ॅमेझॉन डॉट कॉमला टक्कर देण्यासाठी वॉलमार्टने भारतातील फ्लिपकार्टची खरेदी केली आहे.
दरम्यान, कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स या शिखर संघटनेनेही या अधिग्रहणास विरोध केला. काइटचे सरचिटणीस प्रवीण म्हणाले की, या व्यवहाराविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाईच्या पर्यायाचा विचार करू. आजच्या निदर्शनांमुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे एक आव्हान उभे राहिले आहे. वॉलमार्टमुळे देशातील छोटे व्यापारी व शेतकºयांच्या हिताला बाधा येईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

भाजपाही छोटे व्यावसायिक व शेतकºयांना चुचकारतच राजकारण करीत आले आहेत. हा वर्ग भाजपाचा मतदार आहे. त्याच वेळी भारताची विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम देश अशी प्रतिमा मोदी यांनी कायम ठेवायची आहे. या निदर्शनांमुळे या प्रतिमेला तडा जाण्याचा धोका आहे. गंमत म्हणजे, विरोधी पक्षात असताना भाजपाने बहुब्रँड किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीस विरोध केला होता. आता सरकारमध्ये आल्यानंतर भाजपा त्याचे समर्थन करीत आहे. या मुद्द्यावरून माकपाने मोदी सरकारला टोमणा मारला आहे. सरकारी अधिकाºयांनी वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहारावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button