breaking-newsमनोरंजन

मलायका अरोराने पूर्ण केली वयोवृद्ध चाहत्याची इच्छा

आपल्या स्टनिंग लूकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत मलायका एका चाहत्याची इच्छा पूर्ण करताना दिसतेय. होय, मलायका योगा क्लाससाठी जात असताना एका चाहत्याने तिच्याकडे सेल्फीची मागणी केली. मलायकाने कुठलेही आढेवेढे न घेता, चाहत्यासोबत सेल्फी घेतला. 
खरे तर सेल्फीची विनंती करणारा चाहता मनातून थोडा घाबरला होता. अशात मलायका स्वत: थोडी त्याच्या जवळ गेली आणि मोबाईल अँगल सेट करून त्याच्यासोबत सेल्फी घेतला. यानंतर चाहत्याचे आभार मानत, मलायका योगा क्लाससाठी पुढे निघाली. येथे हजर असलेल्या फोटोग्राफर्सलाही मलायकाने पोज दिली.

सध्या मलायका व अर्जुन कपूरच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहे. दीर्घकाळापासून मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button