breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मराठा जात प्रमाणपत्र व पडताळणीचे आदेश लागू

मुंबई – मराठा समाजाच्या 16 टक्‍के आरक्षणासह स्वतंत्र “सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग’ तयार करण्यात आला आहे. यासाठी जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणीचे आदेश सरकारने शुक्रवारी दिले. मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्‍तीला जातीचा दाखला काढावा लागणार आहे. जातपडताळणी समितीकडून तो पडताळून घेतल्यानंतर “सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग’चे(एसईबीसी) प्रमाणपत्र मिळणार आहे.

मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया इतर प्रवर्गाप्रमाणेच सुरू राहणार आहे. 30 नोव्हेंबरपूर्वीचे पुरावे विहित नमुना अर्जासोबत जोडून ते तहसीलदारांकडे द्यावे लागणार आहेत. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाचे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शुक्रवारी राज्य सरकारने अर्जाचा नमुनाही जाहीर केला आहे. या अर्जावर सुरुवातीलाच “महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्राचा नमुना’ असे स्पष्ट लिहिले आहे. त्यानंतर पडताळणी केलेल्या दस्ताऐवजांची क्रमवारीनुसार माहिती द्यावी लागणार आहे. तहसीलदार हा अर्ज उपविभागीय अधिकारी अथवा उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून जातीचे प्रमाणपत्र देण्याची विनंती करणार आहेत.

असे असेल प्रमाणपत्र 
जात प्रमाणपत्रावर संबंधित व्यक्‍तीचे नाव लिहून त्यापुढे वडील व आईचे नाव द्यावे लागेल. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 5 जुलै 2014 अंतर्गत मराठा जात ही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाची असल्याचे या प्रमाणपत्रात नमूद होणार आहे. तहसीलदारांकडे जातीचा दाखला मागताना उमेदवाराने जातीचा उल्लेख असलेला शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामपंचायतमधील गाव नमुना नंबर 14 मधील नोंदणी अथवा नगरपंचायत, महापालिकांमधील जन्म-मृत्यूच्या दाखल्यातील नोंदीची कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button