breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चाची आज आझाद मैदानात बैठक, राज्यभरातून येणार कार्यकर्ते

मुंबई – मराठा आरक्षणप्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नाही. आरक्षणाच्या सुनावणीला सतत पुढची तारीख देण्यात येतेय. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज मराठा क्रांती मोर्चाची आझाद मैदानावर सभा होणार आहे. मराठा आरक्षण आणि सारथी प्रश्नी मुंबईत सकल मराठा क्रांती मोर्चा एकवटणार असून पुन्हा एकदा हा मुद्दा पेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा :-अमरावतीत २८ कोंबड्या अचानक मृत, नागरिकांत बर्ड फ्लूची भिती

आझाद मैदानात होणाऱ्या बैठकीसाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. यासाठी मुंबईत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. खरंतर, आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वाचे निर्णय घेतले. विधानसभेत 21 हजार 99 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या असून त्यात ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेसाठी 81 कोटींची तर मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी 80 कोटींची तरतूद करण्यात आली.

राज्य सरकारने विधानसभेत सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये दोन्ही समाजासाठी भरीव तरतूद केली आहे. ओबीसींच्या महाज्योती संस्थेसाठी 81 कोटींची तर मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी 80 कोटींची तरतूद करण्यात आली. तसंच ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 11 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भटक्या जमाती, विमुक्त जमातींच्या आश्रम शाळांसाठी 216 कोटींचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही समाजाच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार असल्याचा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाची 25 जानेवारीपासून सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरू होणार आहे. राज्य सरकारची आणि वकfलांची 11 तारखेला दिल्लीत वकीलांची बैठक आहे. मी स्वतः त्या बैठकीला दिल्लीत जाणार आहेत. मराठा आरक्षण उपसमितीतील सहकारीही या बैठकीला हजर राहतील. राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला पाहिजे यासाठी केंद्र सरकराचे सहकार्य अपेक्षित आहे. मागील सुनावणीत अटर्नी जनरलला नोटीस काढण्यात आलेली आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button