breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

मराठा आरक्षण : सांगली-कोल्हापूर मार्ग रोखला

सांगली |महाईन्यूज|

एक मराठा लाख मराठा…आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे यासह विविध घोषणा देत शिरोळ तालुका समस्त सकल समाज्याच्यावतीने बुधवार आज (दि.२३) सकाळी साडे दहा वाजता सांगली कोल्हापूर महामार्गावरील उदगांव टोलनाक्यावर महामार्ग रोखून आंदोलन केले. यावेळी महामार्गावर सुमारे दोन तास वाहतुक ठप्प होती. दरम्यान, मराठा समाज्याच्यावतीने तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ व डीवायएसपी किशोर काळे यांना निवेदन दिले.

शिरोळ तालुक्यातील मराठा बांधव आज मोठया संख्येने उदगांव येथे एकत्रित येत सांगली-कोल्हापूर महामार्गावर ठिय्या मारला. त्यामुळे महामार्गावर वाहनाच्या मोठया प्रमाणात रांगा लागल्या होत्या.

यावेळी जिल्हा परीषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर म्हणाले, सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने तात्काळ पुढाकार घेवून आरक्षण दयावे. अन्यथा राज्यातील मराठा समाज आंदोलने करुन सरकारला घेराव घालणार आहे. यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. निता माने व कुरुंदवाडचे नगरसेवक वैभव उगळे यांनी मनोगत व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button