मराठा आरक्षण: मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
![Maratha reservation case, Supreme Court agrees to send notice to all states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/sc-maratha-reservation.jpg)
नवी दिल्ली – मराठा आरक्षणप्रकरणी आज तरी निकाल लागेल अशी आशा असताना आजचा दिवसही अयशस्वी ठरला आहे. कारण मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारवर आता पुन्हा एकदा विरोधकांचा आणि मराठा समाजातील संघटनांचा हल्लाबोल होण्याची शक्यता आहे.
वाचा :-मराठा आरक्षण: २५ जानेवारीला मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी होणार
महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणं देऊन अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली. मात्र ही स्थगिती तूर्तास हटवली जाणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. मराठा आरक्षणाचं पुढे काय होणार ही लढाई सुरुच आहे. अशात आता अंतरिम स्थगिती उठवण्यास घटनापीठाने नकार दिला आहे. हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठं आहे त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल असं या घटनापीठने म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही. मात्र या अॅक्ट अंतर्गत ही भरती करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. ठाकरे सरकारची बाजू मांडणारे मुकुल रहतोगी यांनी विद्यार्थ्यांंचं किती नुकसान होईल, नोकर भरतीचं काय होईल हे प्रश्न उपस्थित केले त्यावर सुप्रीम कोर्टाने हे उत्तर दिलं आहे.
वाचा :-मराठा आरक्षण: आज सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी
सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केलं होतं. आज आरक्षणावरची अंतरिम स्थगिती उठवली जाईल असं वाटत असतानाच सुप्रीम कोर्टाने स्थगिती कायम ठेवली आहे.