breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मराठा आरक्षण! अध्यादेश काढा, अन्यथा परिणामा भोगा, उदयनराजेंची रोखठोक भूमिका

मुंबई: सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. उदयनराजेंनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन, आवश्यक कार्यवाही केली असती, तर आज मराठा आरक्षण टिकवता आले असते, असं उदयनराजे म्हणालेले आहेत. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण प्रकरण खंडपीठाकडे पाठवून, सध्या लागू असलेल्या आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात मराठा समाजात असंतोष उफाळलेला आहे. यादरम्यान उदयनराजे भोसले यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून, मराठा आरक्षणाबाबत आपलं म्हणणं मांडलेलं आहे.

उदयनराजे भोसले काय म्हणाले? पहा सविस्तर…

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते.

मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हते. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो. मी तुमच्या सोबत आहे.

या आधी मराठा आरक्षण प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तरी तिथे आरक्षण टिकवता आले. पण आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा धक्काच बसला आहे. केवळ राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही वाईट वेळ मराठा समाजावर आली आहे. महाराष्ट्र सरकार ५०% च्या वर चे आरक्षण देण्यासाठी कुठलीही विशेष बाब सिद्ध करण्यामध्ये अपयशी ठरले आहे. हे करत असताना राज्य सरकारने कुठलीही खबरदारी घेतली नाही. सरकार कोणत्याही पक्षाचे असो ही सर्वांची जबाबदारी आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे मराठा आरक्षणाच्या प्रकरणातील अंतरिम आदेश हे जणू काही अंतिम आदेश आहेत. असाच हा निकाल दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात पूर्ण सुनावणी झाली नसताना न्यायालयासमोर काय डॉक्युमेंट्स आहेत त्याची पूर्ण चर्चा झालेली नसताना इतका मोठा निर्णय हे मराठा समाजावर अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं हाच मार्ग शासनासमोर आता आहे.

मी सरकारला एकच सांगू इच्छितो. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अद्यादेश काढावा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात ते एकटे नाहीत. याची सरकारने जाणीव ठेवावी.

आपला…
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button