पुणेमहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी जीव देणारे, जीव घेतील – खासदार उद्यनराजे भोसले

पुणे – आरक्षणाबाबत निर्णय होईल, लोकांनी तोडफोड-जाळपोळ करू नका, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे.

 

आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज पुण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील १०० हून अधिक समन्वयकाच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण परिषद झाली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत अनेक बळी गेले आहेत. मुलभूत अधिकारांसाठी भिकाऱ्यासारखे फिरण्याची वेळ आली आहे. वेळीच आरक्षण दिले असते तर आयोगाची गरज भासली नसती. आरक्षणासाठी जीव देणारे, जीव घेतील, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत. आम्ही न्याय हातात घेतला तर सरकारच जबाबदार असाल. जी काही परिस्थिती निर्माण होईल, त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आरक्षणावरून सरकार किती मौन बाळगणार असा सवाल करत सरकारने संगीतखुर्ची थांबवली पाहिजे, असे म्हटले.

 

काय म्हणाले उदयनराजे…

कायद्याचे कारण पुढे करत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवू नका. ८२ टक्के मराठ समाज शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती पाहिली पाहिजे. मराठा समाजात मागासांची संख्या जास्त आहे. मागील ३० वर्षांपासून आरक्षणावर फक्त चर्चाच सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्यावर एवढी चर्चा कशाला. आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आरक्षण प्रश्न चिघळला. समिती, आयोग यातच ही वर्षे वाया गेली. संपूर्ण एक पिढी ऐन उमेदीच्या काळात वंचित राहिली आणि संपूर्ण दिशाहीन झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button