breaking-newsक्रिडा

मयांक अग्रवालचं द्विशतक, रोहित-सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मयांक अग्रवालने पहिल्या कसोटी सामन्यात आक्रमक द्विशतकी खेळी केली आहे. आपला साथीदार रोहित शर्माच्या साथीने मयांकने पहिल्या विकेटसाठी विक्रमी ३१७ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर मयांकने इतर फलंदाजांच्या सोबतीने आपलं पहिलं शतक झळकावलं. यानंतर खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मयांकचे याच शतकी खेळीचं रुपांतर द्विशतकी खेळीत केलं आहे.

३७१ चेंडूचा सामना करताना मयांकने २१५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मयांक अग्रवालने रोहित शर्मा-सचिन तेंडुलकर या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकलं आहे.

आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

  • विरेंद्र सेहवाग – २००८ चेन्नई कसोटी – ३१९ धावा
  • मयांक अग्रवाल – २०१९ विशाखापट्टणम कसोटी – २१५ धावा
  • रोहित शर्मा – २०१९ विशाखापट्टणम कसोटी – १७६ धावा
  • सचिन तेंडुलकर – १९९७ केप टाऊन कसोटी – १६९ धावा

डीन एल्गरच्या गोलंदाजीवर मयांक अग्रवाल पिडीटकडे झेल देत माघारी परतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button