breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसचा मोठा अपघात

रायगड – रायगड नजदीक मुंबई पुणे महामार्गावर खासगी लक्झरी बसचा मोठा अपघात जाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर तर सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्याहून मुबंईकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र सध्या वाहतूक सुरळीत झाली आहे.

वाचा :-ग्रामपंचायत ते संसद पोचण्याचा ‘रिपाई’चा निर्धार

खासगी बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात बसचा चालक व अन्य एक प्रवासी गंभीर जखमी आहे. इतर सहा प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. IRB यत्रंणा, देवदूत टीम, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने तात्काळ वाहतुक सुरळीत केली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button