breaking-newsताज्या घडामोडीपुणे

हेमांगी कवीच्या फेसबुक पोस्टवर तृप्ती देसाई भडकल्या, म्हणाल्या…

पुणे – ती फुलराणी फेम हेमांगी कवीने ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ याविषयावर फेसबुक पोस्ट लिहिल्याने तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला आहे. इंदुरीकर महाराज कीर्तनातून महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा कुठे होता? असा सवाल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. अभिनेत्री हेमांगी कवी आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडच्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या? मला माहित नाही, असा टोलाही देसाईंनी लगावला.

हेमांगी कवीने नुकताच एक work out व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं. यानंतर तिने बाईला ज्याप्रकारे ब्रा घालण्यासाठी जबरदस्ती केलं जातं यावर भाष्य केलं. तिच्या या पोस्टनंत अनेकांनी तिच्या मताचं स्वागत केलं आणि अनेकांनी तिला पुन्हा ट्रोल केलं. त्यानंतर तिला आता तृप्ती देसाई यांनीही घेरलं आहे.

आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड वरून आंदोलन केलं तेव्हा या कुठे होत्या असा सवाल विचारत इंदुरिकर महाराज आपल्या कीर्तनातून महिलांची बदनामी करतात तेव्हा या गप्प का असतात असंही सवाल त्यांनी केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button