breaking-newsपिंपरी / चिंचवड

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पि. चि. विद्यार्थी सेने कडुन परिसरातील बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगाराची संधी

१४ जून रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त पि चि. विद्यार्थी सेने कडुन परिसरातील बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्या करिता अनेक उपाययोजना करण्यात आल्या असल्याने अनेक दिवसांपासून उद्योग व्यवसाय ठप्प पडले आहेत.

बेरोजगारीत अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अनेक परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले आहे. सध्या औद्योगीक कंपन्यांना ही मनुष्यबळ भासत आहे. या सर्व परिस्थितीत युवक युवतींना रोजगाराच्या नविन संधी या ऑनलाईन नोकरी महोत्सवाच्या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे. या संधीचा उपयोग सर्व गरिब व गरजु तरूणांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आव्हान करण्यात आलेले आहे.

प्रविण माळी, उपविभाग अध्यक्ष (चिंचवड विधानसभा)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पि. चि. शहर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button