breaking-newsपुणे

पुण्यात 15 दिवसात 13 हजार परप्रांतीय दाखल

पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यापासून पुण्यात ( परप्रांतीय प्रवाशी आणि मजुरांचा ओघ कायम आहे. वेगवेगळ्या राज्यातून आतापर्यंत पुण्यात 13 हजार 161 प्रवाशी आले आहेत. या प्रवाशांमध्ये सर्वाधिक जास्त संख्या ही मजुरांची.

1 जून ते 15 जूनपर्यंत 90 ट्रेनच्या माध्यमातून हे मजूर पुण्यात दाखल झाले आहेत. रोज साधारण 1 हजारापेक्षा जास्त परप्रांतीय प्रवासी पुण्यात येत आहेत. एकट्या बिहारमधून 5 हजार 77 प्रवासी पोहचले आहेत. बिहारमधून सर्वाधिक जास्त प्रवासी पुण्यात आले आहेत.

पुणे आणि जिल्ह्यातील उद्योगधंदे पूर्ववत सुरु झाले आहेत. त्यामुळे रोजगारासाठी आता परप्रांतीय मजूर दाखल होऊ लागले आहेत. परप्रांतीय मजुरांवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, पोटासाठी हे मजूर पुन्हा आपल्या कामावर रुजू होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे-दानापूर एक्सप्रेसमधून बिहारी प्रवासी, मजूर येत आहेत. दररोज जवळपास 400 ते 500 मजूर येत आहेत. 5 जून ते 15 जून या कालावधीत बिहार मधून 11 ट्रेन पुण्यात पोहचल्या आहेत 

परप्रांतीय प्रवासी मजूर पुण्यात दाखल झाले. मुंबईतून पुणे मार्गे गदग एक्स्प्रेस, कोणार्क एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस आणि गोवा एक्स्प्रेस धावतात, तर पुण्यातून बिहारसाठी फक्त दानापूर एक्स्प्रेस एकमेव गाडी सुटते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर परप्रांतीय प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाते. यासाठी रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथक आणि महसूल पथक 24 तास तैनात आहे. प्रवाशांना कोरोना संदर्भात लक्षणं आढळल्यास संस्थात्मक विलगीकरण केलं जातं. तर उर्वरित प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. त्यानंतर 14 दिवस होम क्वारंटाईनच्या सूचना केल्या जातात 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button