breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मनसेने दिला तृप्ती देसाईंना इशारा…भाजपा पाठोपाठ मनसेचा इंदुरीकरांना पाठींबा

पुणे | महाईन्यूज

गर्भलिंग निदान वक्तव्यावरुन अडचणीत आलेल्या इंदोरीकर महाराजांना काळं फासू असा इशारा भूमाता ब्रिगेडने दिल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावरुन रान उठवलं गेलं, इंदोरीकर महाराजांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही त्यांच्यावर काळं फासण्याचं प्रयत्न केल्यास त्या शूर्पणखा महिलेचे नाक कापू असा इशारा मनसेच्या पुणे महिला शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिलेला आहे.

याबाबत बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, समाजातील वाईट प्रवृत्तीविषयी इंदोरीकर महाराजांनी अनेकदा प्रबोधन केलं. इंदोरीकर महाराजांनी अनेकांचे संसार बसवले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. मात्र आज काही श्रृपनखा महिलेने चार दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास त्यांना काळं फासू असा इशारा दिला आहे. ते अत्यंत निंदणीय आहे तसेच स्त्री असण्याचा गैरफायदा आहे असं सांगत तृप्ती देसाईंवर निशाणा साधला आहे.

https://www.facebook.com/rupalipatilthombare/posts/3720487594658244

तसेच या शूर्पणखा महिलेला आव्हान आहे की, तु ये काळं फासायचं प्रयत्न कर मग तुझं नाक कसं कापायचं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. मग ते काळं कोणाच्या तोंडाला लागेल हे उघड्या डोळ्यानं पाहता येईल. त्यामुळे आता बस्स, प्रचंड गोष्टी सहन केल्या, स्त्री म्हणून कोणतीही चुकीची गोष्ट सहन करणार नाही, त्यामुळे तिच्यामुळे समस्त स्त्री वर्ग नाहक बदनाम होत आहे असा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपापाठोपाठ मनसेनेही इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ या प्रकरणात उडी घेतल्याचं पाहायला मिळते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button