breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मनसेतही येत्या काळात इन्कमिंग दिसेल – बाळा नांदगावकर

मुंबई – कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी काही मनसे नेत्यांनी शिवसेना आणि भाजपात प्रवेश केल्यानंतर यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रत्येक राजकीय पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग सुरूच असते. आमच्याकडे अनेक तरुण कार्यकर्ते आहेत. जे सोडून गेले त्यांचा काही तरी इंटरेस्ट असेल. हे काही एका दिवसात होत नाही. मनसेतही येत्या काळात इन्कमिंग दिसेल’, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

वाचा :-कल्याण-डोंबिवलीत मनसेला धक्का; पालिकेतील गटनेत्याचा भाजपात प्रवेश

कल्याण-डोबिवलीतील मनसे पदाधिकारी शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्यानंतर मनसे नेते कृष्णकुंजवर पोहोचले होते. मनसेचे आमदार राजू पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे यावेळी उपस्थित होते. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले, ‘कल्याण-डोंबिवलीमधील पदाधिकारी दोन दिवसांपूर्वी आमच्यासोबत होते आम्हाला त्यांची नाराजी दिसली नाही. त्यांचा स्वार्थ असेल म्हणून ते गेले. आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलीही नाराजी नाही. आम्ही आज डोंबिवली शहर अध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती केली आहे. पण कोणी आमच्या पक्षात हात घालत असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही. आगामी निवडणुका आम्ही ताकदीने लढणार आणि सत्तेत येण्यासाठीच लढणार.’

वाचा :-मनसेला खिंडार, ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, डोंबिवलीतील मनसेचे माजी विरोधीपक्षनेते, गटनेते मंदार हळबे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर काल मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकीआधी हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button