breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

७ फेब्रुवारीपासून कलर्स मराठीवर ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस’

मुंबई – ‘कोरोनो’ नामक वादळाने गेलं वर्षभर जगाला हादरवून सोडलं. गेल्या वर्षभरात कित्येकांना अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागलं तर कित्येकांच्या चेहऱ्यावरचं हास्यही निमालं. पण आता मात्र निराशेची ही सगळी मरगळ झटकून नव्या वर्षात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला सज्ज झालाय महाराष्ट्राचा सुपरस्टार सुमीत राघवन. आता त्याच्यासह कलर्स मराठीवर रसिकांची टेन्शन्स दूर करण्यासाठी हास्याचा ‘अनलॅाक’ करत कॅामेडीची सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार आहे. अतरंगी कलाकारांची सतरंगी धमाल घेऊन कलर्स मराठी दर्जेदार आणि निखळ मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. पाहायला विसरू नका ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस’ ७ फेब्रुवारीपासून दर रविवारी संध्या ७.०० वाजता कलर्स मराठीवर.

या ‘सुपरफास्ट कॅामेडी एक्सप्रेस’ची सूत्र सांभाळणार आहे, रसिकांचा लाडका, अष्टपैलू अभिनेता सुमीत राघवन. हिंदी चित्रपट, मालिका तसेच नाटकाच्या मंचावरून आजवर सुमीतने रसिकांची मनं काबीज केली आहेत. यापूर्वी मराठी टेलिव्हिजनवर सोहळ्यांचा सूत्रसंचालक म्हणूनही तो रसिकांच्या भेटीला आला होता. मात्र एखाद्या मराठी शोचा सलग सूत्रसंचालक म्हणून या शोद्वारे कार्यक्रमाची एकहाती धुरा सुमीत पहिल्यांदाच सांभाळणार असून त्याच्यातील संवेदनशील, गुणी, हजरजबाबी कलावंताचे विविध पैलू या शोमधून उलगडले जाणार आहेत.

कॅामेडीच्या या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये मराठी रंगभूमी गाजवणारे अनेक दमदार अवलिया कलाकार हजेरी लावतील. आपल्या धमाल अभिनयाने हास्याची धुंवाधार आतषबाजी करण्याची, तर कधीकधी हसता-हसता प्रेक्षकांच्या मनाला पाझर फोडण्याची ताकद या कलावंतांच्या अभिनयात आहे. प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर नंदकिशोर चौघुले, माधवी जुवेकर, रोहित माने, पूजा ठोंबरे, अभिजीत चव्हाण, शशिकांत केरकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, शर्मेश बेतकर, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेमधील तात्या अर्थात अक्षय टांक, मंदार मांडवकर, दिशा दानडे यांसारख्या एकापेक्षा एक सरस आणि दमदार विनोदनिर्मिती करणाऱ्या नामांकित हास्यसम्राटांबरोबर तितक्याच दमदार विनोदी संहिता लेखकांची दमदार खेळी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाची निर्मिती संहिता क्रिएशन्स करत असून आशिष पाथरेसारखा हरहुन्नरी कलावंत, रंगभूमीवर वावरणारा रंगकर्मी या शोचं लेखन, दिग्दर्शन सांभाळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button