breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदगार येथील स्मार्ट सिटीच्या कामांची आयुक्तांकडून पाहणी

पिंपरी / महाईन्यूज

प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागरमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पिंपरी चिचंवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी पाहणी केली. यावेळी आरक्षण क्र ३५१ अ मधील योगा पार्क उद्यान, १८ मी कुणाल आयकॅान रोड, तसेच मिलेटरीचा १८ मी. रस्ता आदी कामांची पाहणी करण्यात आली.

यावेळी नाना काटे यांनी मिलेटरी रस्त्याच्या पाहणीवेळी कुंजिर चौक येथे मिलिटरी रोड व कुणाल आयकॉन रोड यांना जोडण्यात येणाऱ्या लिंक रस्त्याची जागा संबंधित जागा मालकांना योग्य मोबदला देऊन रस्त्याची जागा ताब्यात घेऊन काम सुरू केल्यास कुणाल आयकॉन रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न लवकर सुटेल. तसेच, पिंपळे सौदागरमधील इतर ताब्यात नसलेल्या DP रस्त्यांची जागा ताब्यात घेण्यासाठी संबंधित जागा मालाकांशी प्रत्यक्ष भेटून संबंधित अधिकारी यांनी बैठक घेऊन योग्य तो मोबदला लवकर द्यावा, अशी विनंती केली.

आयुक्तांनी संबंधीत अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यास सांगितले. DP रस्त्याबाबत बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या पाहणीवेळी स्मार्ट सिटीचे जनरल मॅनेजर अशोक भालकर, कार्यकारी उपअभियंता मनोज सेठिया, शिर्के कंपनीचे जनरल मॅनेजर केशव लावंड, प्रोजेक्ट मॅनेजर टी. के. चव्हाण, स्थापत्य विभागाचे शाखा अभियंता नरेश जाधव आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button