breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मनसेचा आज चौदावा वर्धापन दिन

नवी मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा आज (9 मार्च) चौदावा वर्धापन दिन आहे. आगामी काळातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेत यंदा पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात पार पडणार आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या वेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शंभर दिवसांवर राज ठाकरे काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतरचा मनसेने हा पहिलाच वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनासाठी वाशीसह संपूर्ण नवी मुंबई परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

नवी मुंबईचे मनसे अध्यक्ष गजानन काळे यांच्यावतीने ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर देखील लावण्यात आले आहेत. सकाळी दहा वाजता रॅलीने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. रॅलीमध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे, संदीप देशपांडे, अमेय खोपकर आणि नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे सहभाग घेणार आहेत.

त्यानंतर अकराच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमासाठी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे आणि मधुवंती ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button