breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुरंदर तालुक्‍यात जमिनींचे भाव चारपटीने वाढले

  • यंदा 112 कोटींचा महसूल नोंदणी विभागाच्या तिजोरीत

पुणे – पुरंदर तालुक्‍यामध्ये विमानतळ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर या तालुक्‍यात जमिनींच्या व्यवहारात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. त्याचबरोबर जमिनींचे भाव ही सुमारे चारपटीने वाढले असल्याचे दिसून आले आहे. 2016 – 17 या आर्थिक वर्षात पुरंदर तालुक्‍यातून 25 कोटी 69 लाख रुपयांचा महसूल नोंदणी विभागाला मिळाला होता. तर 2017 – 18 या आर्थिक वर्षात पुरंदर तालुक्‍यातून 112 कोटींचा महसूल मुद्रांक शुल्कातून मिळाला आहे. या आकडेवारीवरून पुरंदर तालुक्‍यात जमिनींच्या व्यवहाराची कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असल्याचे समोर आले आहे.

चाकण येथील विमानतळासाठी विरोध झाल्यानंतर जिल्ह्यात विमानतळासाठी जागा शोधण्याचे काम प्रशासनाकडून 2015 मध्ये हाती घेण्यात आले. विमानतळाच्या जागेसाठी जिल्हा प्रशासनाकडून तीन – चार जागेचा पर्याय मांडण्यात आला. यावर पुरंदर येथील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुरंदर येथील जागा विमानतळासाठी निश्‍चित केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2016 रोजी केली. त्यानंतर विमानतळाच्या परिसरातील जमिनींच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. पुरंदर तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागविलेल्या माहितीवरून ही गोष्ट समोर आली आहे. रेडी-रेकनर मधील दरात झालेली वाढ आणि बाजारभाव मोठी वाढ झाल्यानेही महसुलात ही वाढ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button