breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मनसेचं ‘उजवं’ वळण? व्यासपीठावर सावरकरांचीही प्रतिमा

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले अधिवेशन गोरेगाव येथे पार पडत आहे. या अधिवेशनात राज ठाकरे आपल्या पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत. त्याचे प्रतिबिंब मनसेच्या या अधिवेशन कार्यक्रमात दिसत आहे. व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा लावण्यात आली.

मनसेचे आज होणार अधिवेशन हे पक्षाचे रिलॉचिंग असल्याची चर्चा आहे. या अधिवेशनापूर्वी मनसे नेत्यांनी आपल्या ट्विटमधून पक्षाच्या पुढील निर्णयाबाबत सूतोवाच केले होते. त्यानंतर मनसेचा झेंडाही बदलण्यात आला आहे. त्यापूर्वी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.

पहिल्यांदाच सावरकर यांची प्रतिमा मनसेच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे मनसे हिंदुत्ववादी भूमिका घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सावरकर यांचे विचार हिंदुत्ववादी व वैज्ञानिकदृष्टीकोणाला पूरक असल्याचीही अनेकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button