breaking-newsराष्ट्रिय

मतदानाच्या दिवशीही येडियुरप्पा-सिद्धरामैय्या यांच्यात शाब्दिक चकमक

बंगळुरू – कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा आणि विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्यात मतदान प्रक्रिया सुरू असल्याच्या दिवशीही चांगलीच शब्दिक चकमक झडल्याचे दिसून आले. त्याची सुरूवात येडियुप्पा यांनी केली. त्यांनी आपले मतदान झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपल्या शपथविधीची तारीखच जाहीर केली. ते म्हणाले की कर्नाटकात आम्हाला 130 ते 150 जागा मिळतील आणि पंधरा तारखेला काऊन्टिंग झाल्यानंतर मी लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत भेटायला जाईन. त्यांना मी तेथे शपथविधीला येण्याचे निमंत्रण देणार असून बहुतेक 17 मे रोजी आपला मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

त्यावर तातडीने प्रतिक्रीया देताना सिद्धरामैय्या यांनी म्हटले आहे की येडियुप्पा यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसच जिंकेल असा दावा करून ते म्हणाले की आम्हाला 120 पेक्षा निश्‍चीतच अधिक जागा मिळतील. येडियुरप्पांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने त्यांच्या दाव्यावर आपण अधिक भाष्य करणार नाही असेही त्यांनी नमूद केले. आपण केलेले हे विधान म्हणजे एक निवडणुक स्ट्रॅटेजी असल्याचे येडियुरप्पा यांना वाटत असले तरी ते मानसिक संतुलन ढळलेले नेते आहेत अशी टिपण्णीही सिद्धरामैय्या यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button