breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मंत्र्याचा पीए, चित्रपटात अभिनय ते गुन्हेगारी..

व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येतील प्रमुख संशयीत सचिन दिवाकर पवार मंत्री प्रकाश मेहता यांचा स्वीय सचिव होताच, पण त्याने आक्रंदन या मराठी चित्रपटात अभिनयही केला आहे. इव्हेन्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून राजकीय पुढारी, व्यावसायिक आणि चित्रपट सृष्टीतल्या अनेक बडय़ा कलाकारांसोबत ओळखी असलेला सचिन येत्या काळात स्वत: चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरणार होता, अशी माहिती मिळते.

२००४ मध्ये इंग्रजीवरील प्रभुत्व, टापटीप राहाणी आणि अक्कल हुशारी पाहून मेहता यांनी सचिनला स्वीय सहाय्यक म्हणून नेमले. मेहता मुंबईचे भाजप अध्यक्ष होते तेव्हाही सचिन त्यांचा सहाय्यक होता. २०१२मधील महापालिका निवडणुकीत सचिन अपक्ष रिंगणात उतरला. त्यामुळे पक्षातून त्याची हकालपट्टी केली गेली. मात्र सहा महिन्यांतच त्याला घाटकोपर पूर्व मतदार संघाच्या महामंत्रीपदी नेमण्यात आले. २०१७च्या निवडणुकीत सचिनची पत्नी भाजपच्या तिकिटावर रमाबाई नगर येथून निवडूक लढली आणि पडली. त्यानंतर सचिनने मेहतांपासून फारकत घेतली. मेहतांशी वाद असलेल्या भाजपच्या आमदार व खासदाराशी जवळीक साधली. यानंतरही सचिन हा मेहता यांचा सहाय्यक अशीच ओळख सांगे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button