breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मंत्री, खासदार, आमदारांच्या पत्राला पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘केराची टोपली’

महापाैर, उपमहापाैरासह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या तक्रारी, निवेदन पडली अडगळीत

प्रलंबित पत्रांना उत्तरे द्या, आयुक्त श्रावण हर्डिकर यांचे वरिष्ठ अधिका-यांना आदेश

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या विविध मागण्यांसर्दभात मंत्री, खासदार, आमदारांसह पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक वारंवार तक्रारी, निवेदने देत असतात. मात्र, त्या पत्रांना कुठलेही उत्तर त्या-त्या विभाग प्रमुखांकडून दिले जात नाही. अनेकदा ही निवेदने अडगळीत टाकून त्याला केराची टोपली दाखविली जात असते. याबाबत सन्मानियांकडून आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांना प्राप्त तक्रारी, निवेदनावर कार्यवाही करावी, त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.

राज्याचे विविध खात्याचे मंत्री, मावळ, शिरुरचे खासदार आणि पिंपरी, चिंचवड, भोसरीसह अन्य आमदार, महापाैर, उपमहापाैर, विरोधी पक्षनेते, सर्व गटनेते, नगरसदस्य यांच्या विविध तक्रारी, निवेदने वारंवार देत असतात. त्या प्राप्त होणा-या तक्रारी व निवेदनावर वेळेत कार्यवाही अपेक्षित आहे. तसेच माननियांना अवगत करणे हे कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने अभिप्रेत आहे. मात्र, तक्रारी, निवेदनावर विहित मुदतीत कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे येवू लागल्या आहेत.

याबाबत आयुक्तांनी सन्मानियांच्या तक्रारी दखल घेतली आहे. त्यानूसार सदरील बाब गंभीर स्वरुपाची असून कार्यालयीन सुसूत्रतेस धरुन नाही. जनमानसातील महापालिकेच्या विश्वासर्हतेस तडा जात आहे. सर्वांच्या प्रलंबित तक्रारी व निवेदनाच्या अनुषंगाने यथोचित कार्यवाही करुन कार्यवाहीचा अहवाल सन्मानियांना अवगत करुन तक्रारी निकाली काढण्यात याव्यात. त्या नोंदी संगणक रजिस्टरला नोंदी घेण्यात याव्यात.

तक्रारी संर्दभात प्राधान्याने कार्यवाही न केल्यास अथवा त्यांना अवगत करुन न दिल्याचे निर्देशनास आल्यास. याशिवाय संगणकीय आवक रजिस्टरला शेरा काॅलममध्ये केलेल्या कार्यवाहीचा तपशिल नमुद न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विभाग प्रमुख व शाखा प्रमुखाची ग्राह्य धरुन नाईजास्तव नियमाधिन कारवाई करणे भाग पडेल. दरम्यान, सर्व विभाग प्रमुखांना पुन्हा एकदा स्मरण करुन सन्मानियांच्या तक्रारी व निवेदनांवर वेळोवेळी सुचित केलेल्या पत्रकांनूसार प्राधान्याने कार्यवाही करावी, मुदतीत कार्यवाही न झाल्यास संबंधित विभाग प्रमुखावर नियमाधिनानूसार कारवाई करण्यात येईल, असा आदेश आयुक्त हर्डिकर यांनी दिला आहे.

भाजप कारभा-यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष…

भाजप चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर ‘लेटर बॉम्ब’ टाकला होता. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘तातडीने’ सर्व विभागप्रमुखांना पत्र पाठवून 48 तासात उत्तरे मागविली होती. आमदारांनी विविध 26 प्रश्नांसह आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते की, शहर विकासाच्या दृष्टीने व पालिका आर्थिक हित साध्य होण्याकरिता मी वारंवार लेखी पत्राद्वारे सुचविण्यात आलेल्या विषयांवर हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत केल्याचे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button