breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मंत्रालयाने वाहनांच्या टायरमधील हवेसंबंधी जारी केली एक नवीन गाईडलाईन

मंत्रालयाने वाहनांच्या टायरमधील हवेसंबंधी एक नवीन गाईडलाईन जारी केली आहे.मागील काही महिन्यांमध्ये रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने अनेक नियमांमध्ये दुरुस्ती आणि बदल केले आहेत. आता मंत्रालयाने एक नवीन गाईडलाईन जारी केली आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या गाईडलाईननुसार, मोटार वाहन कायद्यामध्ये संशोधन करण्यात आले आहे. या अंतर्गत अधिकांश 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग प्रणाली सुचवली आहे. या प्रणालीमध्ये सेंसरद्वारे गाडीच्या टायरमधील हवेबाबत ड्रायव्हरला माहिती मिळेल.

हवा कमी असल्यास गाडीमध्ये डॅशबोर्डवर ड्रायव्हरला अलर्ट केले जाईल. यामुळे रस्ते सुरक्षामध्ये वाढ होईल. सोबतच मंत्रालयाने टायर दुरुस्ती किटची देखील शिफारस केली आहे. यात टायर पंक्चर (ट्यूबलेस टायर) झाल्यावर दुरूस्ती किटच्या मदतीने सिलेंटला टायर ट्रेंडमध्ये पंक्चर झालेल्या ठिकाणी एअर सीलसोबत लावले जाते.

टायर प्रेशर मॉनिटरिंग प्रणाली आणि टायर दुरुस्ती किट उपलब्ध झाल्यानंतर वाहनांमध्ये स्टेपनीची आवश्यकता समाप्त होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button