breaking-newsUncategorizedपिंपरी / चिंचवड
भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती मिडिया सेल अध्यक्ष पदी किशोरी कडू यांची निवड
पुणे ( महा ई न्यूज ) – अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती पुणे मिडिया सेल अध्यक्षपदी किशोरी कडू यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र मुख्य संघटक बाबुराव क्षेत्रे-पाटील यांनी दिले.
यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रीकस हयुमन राइटस मिशन महाराष्ट मुख्य संघटक बाबुराव क्षेत्रे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर कार्यकारिणी व पदाधिकारी निवड करण्यात आली. पुणे शहर अध्यक्ष सुनंदा पाटील , पुणे शहर अध्यक्ष सचीन खंडाळे, महिला व बाल कल्याण विभागाचे अध्यक्ष शिवाजी सुर्यवंशी, पुणे शहर संघटक अकबर मेमन, कामगार अध्यक्ष राहुल बोराडे, पुणे शहर उपाध्यक्ष प्रवीण ठोंबरे, हडपसर मतदार संघ अध्यक्ष सुनील बागडे, वाहतूक विभाग उपाध्यक्ष सचीन साठे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.