पिंपरी: इंजिनिअरिंग पुस्तकाची झेरॉक्स काढून विक्रीसाठी ठेवले व पुस्तकाची साॅफ्ट कॉपी संगणकात जतन केली. कॉपीराईट अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी झेरॉक्स सेंटरमधील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॅराडाईज कॉपी अॅन्ड स्टेशनरी व ओम साई कॉपिअर्स, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे शनिवारी (दि.26) दुपारी दीड वाजता ही घटना घडली.
प्रकाशक रविंद्र विठ्ठल वाणी (वय 51, रा. प्रभात रोड, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून गणेश बाबुभाई परमार (वय 26, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी), घनश्याम बाबुभाई परमार (वय 25, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), रियाज खान मोहम्मद इलियास खान (वय 31, रा. पिंपरी) आणि भास्कर शिवाजी दुधभाते (वय 32, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांच्या विरोधात कॉपिराईट अॅक्ट 1957 कलम 63, 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.