breaking-newsताज्या घडामोडीलेख

भोगी : आनंद घेणारा वा उपभोगणारा भारतीय सण

भारतीय संस्कृती ही सण-उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतूमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण-उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते!पौष कृष्ण १ ते पौष कृष्ण ३ या तीन दिवसांत दिवाळी, नवरात्र या सणांप्रमाणेच मकर संक्रांती या सणाचेही पर्व असते!दिवाळी किमान सहा दिवस, नवरात्र नऊ दिवस तशी मकर संक्रांत ही एकूण तीन दिवसांचे पर्व असते!पौष महिन्यातील मकर संक्रांतीच्या पर्वात तीन ही दिवसांचे सण वेगवेगळे साजरे होतात. भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण आहेभोगी या सणाची माहिती पौष महिन्यात ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच भोगी सण होय!भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे..”आनंद घेणारा वा उपभोगणारा!”या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे! कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो!पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे!जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला “भोग” म्हणतात. याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच “भोगी देणे” म्हणतात!भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रीत पाण्याने अभ्यंगस्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात. मुली व महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशाप्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो.या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे, गाजर, हरभरे, वांगी या सर्वांची मिळून केलेली लेकुरवाळी भाजी असा बेत करतात.या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिचे आदरातिथ्य केले जाते देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात.जेवणानंतर सवाष्णीला दान- दक्षिणा देण्याची ही पध्दत आहे!वर सांगितल्याप्रमाणे जर सवाष्ण जेवायला येणे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात!आपण भोगी साजरी का करावी?या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो.मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन ऊबदाररूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो, त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात. मराठवाड्यात या भाजीला ‘खेंगट’ म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरूवात होते. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण “पोंगल ” व आसाम मध्ये ” भोगली बिहू ” आणि पंजाब मध्ये ” लोहिरी ” ,राजस्थान मध्ये ” उत्तरावन ” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगिकारलं जातं. नवा बदल केला जातो. म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची.या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button