TOP Newsताज्या घडामोडीपुणे

रसिकांनी लुटला कोजागिरी मैफिलीचा आनंद !

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित मराठी युगुलगीतांच्या ‘शब्दरूप आले मुक्या भावनांना ‘ या सुरेल मैफिलीला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला !’जतन, पुणे ‘ प्रस्तुत या कार्यक्रमात सचिन घनपाठी, गौरी कुंटे, पल्लवी आनिखिंडी यांनी गीते सादर केली. मिहिर भडकमकर ( की-बोर्ड), अक्षय पाटणकर(तबला),हेमंत पोटफोडे( साईड ऱ्हीदम) यांनी साथसंगत केली.

या कार्यक्रमाचे आयोजन शनीवार, ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले होते. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. छाब्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा दास यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरीची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात ‘तोच चंद्रमा नभात’, ‘उमलली एक नवी भावना’, ‘बघत राहू दे’, ‘रात चांदणी’, ‘चांदण्यात फिरताना’ , ‘तुझी माझी प्रीत’, ‘धुंद एकांत हा’, ‘पाठशिवा हो पाठशिवा’,’आज चांदणे उन्हात’, ‘शारद सुंदर’ , ‘धुंदी कळ्यांना’, ‘उगवली शुक्राची चांदणी’, ‘माझ्या प्रीतफुला’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘माझ्या रे प्रीत फुला’ अशा अनेक बहारदार युगुलगीतांची बरसात झाली . ‘फिटे अंधाराचे जाळे ‘या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४२ वा कार्यक्रम होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button