breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भिडे-एकबाेटे यांच्यावरील दाखल गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात

पुणे |महाईन्यूज|

काेरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 साली झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे आणि समस्त हिंदु आघाडीचे प्रमुख मिलींद एकबाेटे यांच्यावर पुणे ग्रामीण पाेलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणी एकबाेटे यांना अटक देखील झाली हाेती. या गुन्ह्याचा तपास आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गुणे ग्रामीण पाेलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पत्रकारांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशाेर राम हे उपस्थित होते.

पाटील म्हणाले संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांच्यावर दाखल गुन्हाची चार्जशिट सरकारची मंजुरी आल्यानंतर दाखल करण्यात येणार आहे. काेरेगाव हिंसाचाराप्रकरणी एकूण 30 गुन्हे गुणे ग्रामीण पाेलिसांकडे दाखल झाले हाेते. त्यातील 14 गुन्ह्यांची चार्जशिट दाखल करण्यात आली आहे तर 16 गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु आहे. भिडे आणि एकबाेटे यांच्यावरील दाखल गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात असून राज्य सरकारकडे चार्जशिट दाखल करण्याबाबत परवानगी मागण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button