breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेचे पिण्याचे पाणी हद्दीबाहेर; वर्षाेनुवर्षे अनधिकृत नळाद्वारे पाणी चोरणा-यावर कारवाई कधी?

गहुंजे हद्दीत महापालिकेचे नळजोडणी घेणा-या 25 जणांवर कारवाई नाही

पिंपरी |महाईन्यूज|विकास शिंदे

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. आयुक्तांनी समन्यायी पाणी पुरवठ्याच्या नावावर गेली एक महिना झाले दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षापासून महापालिका हद्दीच्या बाहेर अनधिकृत आणि चोरुन पाणी पुरवठा सुरु आहे. शहराचे पाणी हद्दीच्या बाहेर जात असताना पाणी पुरवठ्याचे अधिकारी-कर्मचारी झोपले होते का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, गहुंजे हद्दीतील 25 नळकनेक्शन तोडण्यात आली असून राजकीय दबावापोटी त्या नळधारकांवर फाैजदारी कारवाई टाळली आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाणी टंचाई सुरु आहे.आयुक्तांनी समन्यायी पाणी पुरवठ्याच्या गोंडस नावावर दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला आहे. दोन महिने एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. मात्र, अनधिकृतपणे, चोरुन शहराचे पाणी पळविणा-यावर महापालिकेने कठोर कारवाई केलेली नाही. त्यामुळे सुमारे 40 टक्केहून अधिक पाणी मुरतेय कुठे हेच समजेना झाले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण यंदा दोनवेळा शंभर टक्के भरले. यावर्षी नोव्हेंबर महिना मध्यावर आलेला असतानाही धरण तुडुंब भरलेले आहे. आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पाणीसाठा धरणामध्ये असतानाही शहरवासियांवर कृत्रिम पाणी टंचाई लादण्यात आली.

महापालिका दररोज 500 एमएलडी पाणी उचलते, मात्र याच प्रमाणात त्याचे वाटप होत नाही. शहरात 1 लाख 50 हजार नळजोड आहेतय तर शहराची लोकसंख्या 27 लाख लाखांपर्यंत पोहचली आहे. त्या तुलनेत पाण्याची गळती किंवा तूट ही 40 टक्के इतकी आहे. शहराची लोकसंख्या विचारात घेतली तर यासाठी 600 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र एवढे पाणी आपण उचलू शकत नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत नळधारकांवर कारवाई सुरु आहे. त्यात मामुर्डी-गहुंजे हद्दीत महापालिकेचे पाणी चोरुन घेण्यात आलेले आहे. साधारणता 25 नळधारकांनी अनधिकृतपणे नळकनेक्शन घेतलेले आहे. त्या नळकनेक्शन धारकांवर पाणी पुरवठा विभागाने कारवाई केली आहे. सर्वच नळ कनेक्शन तोडली असून त्याच्यावर फाैजदारी दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात पाणी चोरणा-याची संख्या नेमकी किती आहे. अनधिकृतपणे नळ जोडणी संख्याही अधिक असून राजकीय दबावापोटी त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे समोर येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button