breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारतीय लहुजी पँथरच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

पिंपरी | प्रतिनिधी

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन काळेवाडी पोलिस चौकी परिसरात लहान मुलांना समोसा, जिलेबी व पेढे वाटप करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. एपीआय दाभाडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले आहे. यावेळी एपीआय दाभाडे, पीएसआय क्षिनगारे, पीएसआय मनेर, काळेवाडी पोलिस चौकीचे कर्मचारी आर.एम.तळपे, इ.आय.मोमीन, जी.एम.आडके, पोलिस शिपाई ज्ञानेश्वर तोडकर, पोलिस नाईक अमोल दातार, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश संघटक भारतीय लहुजी पँथर तसेच राष्ट्रीय सदस्य एक मराठा लाख मराठा युवराज दाखले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस सचिन लिमकर, आनंद कुलकर्णी, राहुल शिर्के, सुमित शिंदे आदी उपस्थित होते.

तसेच भारतीय लहुजी पँथर मध्यवर्ती कार्यालय भोसरी या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरातील बालाजीनगर मध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय लहुजी पॅंथर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांचे वतीने संदिपान झोंबाडे यांच्या हस्ते व एमआयडीसी पोलीस स्टेशन पीएसआय ढेरे आणि पीएसआय पंचमुख यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे.

यावेळी भारतीय लहुजी पॅंथरचे प्रदेश संघटक युवराज दाखले राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस सचिन निमकर, बालाजीनगरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बीबी शिंदे, सुभाष बनसोडे, किसन सरवदे, कोंडाबाई गायकवाड, अंगणवाडी सेविका शैलेजा चौधरी, श्रमिक महीला विकास संघाच्या अध्यक्ष सविता झोंबाडे, सविता आव्हाड, सुरेश मिसाळ, आकाश शिंदे, सागर बोरसे, महादेव सोनवणे, रविंद्र कांबळे, नामदेव घोलप, भारतीय लहुजी पँथर ग प्रभाग अध्यक्ष दिलीप गोरके, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

वाचा- देशाला अधिक बलशाली आणि मजबूत लोकशाही राष्ट्र बनविण्यासाठी संकल्प करूया- महापौर माई ढोरे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button