breaking-newsआंतरराष्टीय

भारतीय पाणबुडीबाबत पाकिस्तानचा दावा तथ्यहीन

भारतीय नौदलाचे स्पष्टीकरण

भारताच्या पाणबुडीचा आपल्या सागरी हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याचा पाकिस्तानचा दावा भारतीय नौदलाने फेटाळून लावला.

भारताची एक पाणबुडी आमच्या प्रादेशिक सागरी हद्दीत येण्याच्या प्रयत्नात होती. पण आम्ही हा प्रयत्न हाणून पाडला, असे पाकिस्तानच्या नौदलाने म्हटले होते.

पाकिस्तानी नौदलाने प्रसारमाध्यमांना एक ध्वनिचित्रफीत सादर केली असून ती खरी असल्याचा दावा केला आहे. ४ मार्च रोजी ८.३५ वाजता ही ध्वनिचित्रफीत तयार केली असून त्यात भारतीय नौदलाची पाणबुडी दाखवण्यात आली आहे. पाकिस्तानी नौदलाने या पाणबुडीला कौशल्याने परतवून लावल्यामुळे ती सागरी हद्दीत प्रवेश करू शकली नाही, असा दावा करण्यात आला आहे. भारतीय पाणबुडीवर आम्ही हल्ला चढवू शकलो असतो. पण संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून तसे केले नाही. पाकिस्तानी नौदल हे सागरी हद्दीचे रक्षण करण्यास सज्ज असून कुठल्याही आक्रमणाला पूर्ण ताकदीनिशी उत्तर दिले जाईल असा इशारही पाकिस्तानी नौदलाने दिला आहे.

भारतीय नौदलाने मात्र पाकिस्तानचा दावा फेटाळला. पाकिस्तानचा हा अपप्रचार असल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button