breaking-newsराष्ट्रिय

भारतीय तटरक्षक दलाचे १० जणांचे पथक तेलगळती रोखण्यासाठी मॉरिशसला रवाना

नवी दिल्ली – मॉरिशसच्या दक्षिण-पूर्व तटवर्ती क्षेत्रात झालेली तेलगळती आटोक्यात आणण्यासाठी भारताने ३० टन तांत्रिक उपकरणे आणि साहित्य भारतीय हवाई दलाच्या विमानाने मॉरिशसला पाठविले आहे.

भारतीय तटरक्षक दलाचे १० सदस्यांचे एक पथकही मॉरिशसला पाठविण्यात आले आहे. हे पथक तेलगळती आटोक्यात आणण्याच्या कामात निष्णात आहे. हे पथक मॉरिशसला तांत्रिक आणि तेलगळती आटोक्यात आणण्याच्या कामात सहकार्य करणार आहे, असे रविवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

मॉरिशसच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावर जपानचे एक जहाज खडकावर आदळले आणि त्यामधून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनक्षम असलेल्या क्षेत्रात हजारो टन तेलगळती होत आहे. एमव्ही वाकाशिओ या जहाजाचे तुकडे झाल्याचे शनिवारी मॉरिशसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button